भजनी मालिका

भजने

टाकूनियां निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥ न लगे उपवास पारणें कारणें । सुखे नारायण घरा येती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

टाळ दिंडी हातीं उभा महाद्वारीं । नामा कीर्तन करी पंढरिये ॥१॥ आवडीचेनि सुखें वोसंडतु प्रेमें । गातों मनोधर्में हरिचे गुण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

टाळ विणे मृदंग वाजती अपार । नारद तुंबर गीत गाती ॥१॥ शुक वामदेव अंबऋषि सादर । मध्यें ज्ञानेश्वर ब्रह्मरुप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

टाळ विणे मृदंग सुस्वर गायन । कोंदलें गगन दाही दिशा ॥१॥ प्रळयींच्याअ विजा वर्षती अपार । जाला धुंधकार दाही दिशा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

टाळ हे मृदंग गायनें पुढतीं । रंजविती निवृत्ति अवघेजण ॥१॥ गीतार्थ करिती योगी मुनिजन । रंजविती मन निवृत्तीचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥१॥ गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥ पंढरीचा हाट कउलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

टिपरियाचे घाई गे नाच सुखें बाई । गितीं गाऊनियां हरिचें संगमसुख घई ॥१॥ नाचोनियां फेरि गे गुण त्याचे उच्चारी । जेणें काग बग रिठा मर्दियले वैरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥ पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ठांईहूनि जातीं उखळें उडताती । मस्तकीं पडताती येवोनियां ॥१॥ पाटे वरवंटे वसुपात्रालागीं । जीव त्या प्रसंगीं येता झाला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव