भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाकूनियां निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे

takuniyan ninda stutiche vachan | taya narayan javalin ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
टाकूनियां निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥ न लगे उपवास पारणें कारणें । सुखे नारायण घरा येती ॥२॥ ठायींच बैसोनि जपे नामावळी । पुर्ण कर्मा होळी होय तेणें ॥३॥ एका जनार्दनीं धरितां पायीं भाव । रमेसह देव घरी नांदें ॥४॥