भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळ्या चिपोळ्यांचा ध्वनी आयकतां

talya chipolyancha dhvani ayakatan

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
टाळ्या चिपोळ्यांचा ध्वनी आयकतां । आनंद हा चित्तां सामावेना ॥ १ ॥ लावियेले नेत्र निद्रेंत जागृती । तुकाराममूर्ति देखियेली ॥ २ ॥ ठेवियेला हस्त मस्तकीं बोलून । दिधलें वरदान कवित्वाचें ॥ ॥ बहिणी म्हणे नेणें स्वप्न कीं जागृती । इंद्रियांच्या वृत्ती वोसरल्या ॥ ४ ॥