भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठाकुनी आलिये तुजपाशीं

thakuni aliye tujapashin

ठाकुनी आलिये तुजपाशीं । थिते मुकलिये मनुष्यपणासी ॥१॥ भलें केलें विठ्ठला पिकें भरला साउला । घरीचीं कोपतीं सोडी जाऊं दे वहिला ॥ध्रु०॥ संसार साउला माझा पालटुनि देसी । तरी मी होईन तुझी कामारी दासी ॥२॥ संसार साउला माझा पालटुनि देसी । बापरखुमादेवीवरा विठ्ठला गुणरासी ॥३॥