भजनी मालिका

भजने

जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्ती । तिहीं अवस्थात हरि म्हणतां मुक्ति ॥१॥ ऐसें वेदशास्त्रें गर्जती । विवादतीं पुराणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जागृती स्वप्नीं सुषुप्तीमाझारीं । जपें नाम श्रीहरी सर्वकाळ ॥१॥ साधन आणीक न लगे सकळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणतसां जरी अंतरींचें । तरी कां हो वाचे वदवितां ॥१॥ केविलवाणे तुमचे दास । देखतां उपहास होतील ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जाणतां जाणतां कां रे वेडा होसी । नाथिल्याच्या पिसीं हांव भरी ॥१॥ दोन दिवसांचे उसणे व्यापारी । काय त्यांची थोरी मानितोसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणती हे कळा हारपोनि गेली । वृत्ति मावळली तयामाजीं ॥१॥ पाहतां पहाणें हारपोनि गेलें । मी माझें सरलें तयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥ कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो । न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जाणते नेणते दोघेही गुंतती । वायां कुंथाकुंथीं करिती रया ॥१॥ प्रपंच व्यसन न चुके पामरा । करती वेरझारा न चुके रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥ सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणतेपणें विधिनिषेध पोटीं । अज्ञान तें दृष्टी पळे दूर ॥१॥ अज्ञान बरवें अज्ञान बरवें । सज्ञान तें हावे बुडोनि जाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंहि भजावा पंढरीराव ॥१॥ एका पंडुं आणिका भरीं । तेणें फेरी चौर्‍याशींची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणत्या नेणत्या हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप सुखें करा ॥१॥ न करा साधन वाउगाची शीण । विठ्ठलरुपीं मन निमग्न राहो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणपण बरें देवाचे ते शिरीं । आम्ही ऐसीं बरीं नेणतीं च ॥१॥ देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाणपणें वस्तु जाणों मी जाये । माझी जाणीव कैसी मज आड ठाये ॥१॥ जाणों मी कैसें जाणों मी कैसें । जाणपणें पिसें लावियेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणबला भाव तया सुंदरीसी । म्हणते पतीसी नम्रतेनें ॥१॥ जावें आतां तुम्हीं देवाचे भेटीसी । उठली वेगेंसी सन्मानानें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव