भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणतां जाणतां कां रे वेडा होसी । नाथिल्याच्या पिसीं हांव भरी

janatan janatan kan re veda hosi | nathilyachya pisin hanv bhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणतां जाणतां कां रे वेडा होसी । नाथिल्याच्या पिसीं हांव भरी ॥१॥ दोन दिवसांचे उसणे व्यापारी । काय त्यांची थोरी मानितोसी ॥२॥ दिवसांची छाया पुर्व पश्चिमेसी । तैशी या देहाची स्थिती जाणा ॥३॥ एका जनार्दनीं हरिकृपेंवीण । दावील ही खूण कोण बापा ॥४॥