भजनी मालिका
← भजनांकडे परत

जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्ती । तिहीं अवस्थात हरि म्हणतां मुक्ति

jagrutin svapnin ani sushupti | tihin avasthat hari mhanatan mukti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्ती । तिहीं अवस्थात हरि म्हणतां मुक्ति ॥१॥ ऐसें वेदशास्त्रें गर्जती । विवादतीं पुराणें ॥२॥ नाम निरंतर मुखीं सदा । नोहे बाधा भौतिक ॥३॥ एका जनार्दनीं शरण । भुक्तिमुक्तिची नाहीं कारण ॥४॥