भजनी मालिका
← भजनांकडे परत

जागृती स्वप्नीं सुषुप्तीमाझारीं । जपें नाम श्रीहरी सर्वकाळ

jagruti svapnin sushuptimajharin | japen nam shrihari sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जागृती स्वप्नीं सुषुप्तीमाझारीं । जपें नाम श्रीहरी सर्वकाळ ॥१॥ साधन आणीक न लगे सकळ ॥२॥ रामनाम निखळ जपें आधीं ॥३॥ पापाचे पर्वत छेदी नाम व्रज । हाचि पैं निर्धार ऋषीश्वर ॥४॥ एका जनार्दनीं नाम निजधीर । पावन साचार रामनाम ॥५॥