भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणत्या नेणत्या हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप सुखें करा

janatya nenatya hachi upadesh | viththal vache jap sukhen kara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणत्या नेणत्या हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप सुखें करा ॥१॥ न करा साधन वाउगाची शीण । विठ्ठलरुपीं मन निमग्न राहो ॥२॥ भलतिया परी विठ्ठलासी गाये । सुखा उणें काय तुजाला आहे ॥३॥ जन्ममरणा तुटे आधिव्याधी । विठ्ठलनामें सिद्धि पायां लागे ॥४॥ एका जनार्दनीं जपतां विठ्ठल । न लगे तया मोल धन कांहीं ॥५॥