भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणते नेणते दोघेही गुंतती । वायां कुंथाकुंथीं करिती रया

janate nenate doghehi guntati | vayan kunthakunthin kariti raya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणते नेणते दोघेही गुंतती । वायां कुंथाकुंथीं करिती रया ॥१॥ प्रपंच व्यसन न चुके पामरा । करती वेरझारा न चुके रया ॥२॥ वोढाळ सांपडतां बांधिती दावणी । कोण करुणावचनीं सोडी रया ॥३॥ एका जनार्दनीं करितां प्रयाणा । नाहीं ती करुणा यमासी ॥४॥