भजनी मालिका

भजने

चोखामेळियाची ऐकोनी करुणा । चालिले भोजना देवराव ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव चालियले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चोखामेळियानें पाजियेलें दहीं । पडों दिलें नाहीं उणें त्याचें ॥१॥ तयाचें चरित्र परिसावें सादर । करितों नमस्कार सतजनां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चोखोबाचीकांता असे ती गर्भिण । झाले तीस पूर्ण नव मास ॥१॥ करूनि विनंति पतिसी बोलत । असावें साहित्य घरामाजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चोख्याचे अंगणीं बैसल्या पंगती । स्त्री ते वाढिती चोखियाची ॥१॥ अमृताचें ताट इंद्रें पुढें केलें । शुध्द पाहिजे केलें नारायणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चोरटें काचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥ नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥१॥ ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥ तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चोरासी खंडन करावें हाचि धर्म । आणीक नाहीं वर्म दुजें कांहीं ॥१॥ माझ्या विठोबाची आज्ञा पैं मोडिली । शपथ पाळिलीं नाहीं दुष्टे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ