भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे

choraten sunen marilen tale | kenun kari pari na sandi chale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥१॥ ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥२॥ तुका म्हणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥३॥