भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोराचियासंगे क्रमितां पैं पंथ

chorachiyasange kramitan pain panth

चोराचियासंगे क्रमितां पैं पंथ । ठकूनियां घात करितील ॥१॥ काम क्रोध लोभ घेऊनियां संगें । परमार्थासि रिघे तोची मूर्ख ॥२॥ बांधोनियां शिळा पोहूं जातां सिंधू । पावें मतिमंदु मृत्यु शीघ्र ॥३॥ देहगेहभ्रांती सोडुनीया द्यावें । साधन करावें शुध्द मार्गे ॥४॥ ज्ञानदेव ह्मणे तरीच साधेल । नाहीं तरी चळेल मध्यभागीं ॥५॥