भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखियाचे घरी नवल वर्तले

chokhiyache ghari naval vartale

रचनाकार: संत बंका · अभंग
चोखियाचे घरी नवल वर्तले । पाहुणे ते आलें देवराव ॥१॥ सोयर निर्मळा होत्या दोघी घरी । पाहुणा श्रीहरी आला तेव्हां ॥२॥ खोपट मोडकें द्वारी वृदांवन । बैसे नारायण तया ठायीं ॥३॥ दोघी प्रेमभरित धरिती चरण । घालितीं लोटांगण जीवेभावें ॥४॥ कोठोनियां स्वामी आलेती तें सांगा । येरू म्हणे पै गा दूर देशीं ॥५॥ झाले दोन प्रहर क्षुधेने पीडिलों । म्हणोनियां आलों तुमचे सदनी ॥६॥ कोणाचें हें घर सांगा हो निर्धार । ते म्हणती महार आम्ही असों ॥७॥ येरू म्हणें घरी कोण अधिकारी । कैसी चाले परी संसाराची ॥८॥ मग त्या ऐकोनी तयाचे बोलणें । म्हणती देवाजीनें निकें केलें ॥९॥ वंका म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । चोखियाचे घरी राहे सुखें ॥१०॥