भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोजवीत घरां येती । ज्यांचा देखती शुध्द भाव

chojavit gharan yeti | jyancha dekhati shudhda bhav

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चोजवीत घरां येती । ज्यांचा देखती शुध्द भाव ॥१॥ ऐसे करुणाघन हे संत । करिती हेत परिपूर्ण ॥२॥ पाचारुनियां ह्रदयीं धरिती । निकट बैसविती जवळी त्या ॥३॥ निळा म्हणे अनुभव झाला । तोचि दाविला बोलोनि ॥४॥