भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोरा संगतीनें गेला। वाटें जातां नागवला

chora sangatinen gela| vaten jatan nagavala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
चोरा संगतीनें गेला। वाटें जातां नागवला ॥१॥ तैसी सांडोनियां भक्ती धरी विषयाची संगती ॥२॥ अग्निसर्वे खेळे । न जळे तो परी पोळे।।३।। विश्वासला चोरा जनी म्हणे घाला बरा ||४||