भजनी मालिका

भजने

ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥ निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी । माझिया राज्या आली हानी । म्हणोनि माभळभट पाठविला ॥१॥ तंव पिढेदान त्या प्राप्त झालें । नवलचि हें अपूर्व ऐकिलें । येऊनि आम्हातें जाणविले । नव्हें बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसा तो ब्राह्मण दरिद्रें पीडिला । सदा स्वरूपीं झाला अखंडीत ॥१॥ न करीच खंती कांहीं तो अंतरीं । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसा दोहीं स्थ्‍ळींचा महिमा । अगाध उपमा नाहीं त्या ॥१॥ पंचक्रोशीमाजी भार । छबिने अपार मिरवती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसा नित्यानित्य चालतां सुपंथीं । पदोपदीं कीर्ति नामघोष ॥१॥ आला आळंकापुरीं इंद्रायणी-तीरीं । स्नानसंध्या करी देवपूजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसा निळा नित्यानंदी निमग्न केला । देऊनियां नामस्मरण चरणीं स्थापिला ॥१॥ तेणें ब्रम्हानंदे गर्जे नाम वैखरी । आठवूनि रुप तुमचें हदयमंदिरीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसा पुत्र देईं संतां । तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥ गाता नित्य नेमें । वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसा बहुत काळ क्रमिला क्षेत्रांत । मग धरिला पृथ्वी हेत पलाटणीं ॥१॥ उत्तरदक्षीण मानस करावें । तीर्थां अवलोकावें आणि क्षेत्रां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा