भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन

aisa koni nahin hen jaya navade | kanya putra ghode dara dhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥ निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥ काय पळे सुखें चोर लागे पाठी । न घलावी काठी आड तया ॥२॥ जयाचें कारण तोचि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥३॥ तुका म्हणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥४॥