भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा गे माये कैसा योगी

aisa ge maye kaisa yogi

ऐसा गे माये कैसा योगी । जे ठाई जन्मला तो ठाउ भोगी ॥१॥ माय कुमारि बाप ब्रह्मचारी । एकविस पुत्र तयेचे उदरी ॥२॥ आचार सांडुनि जालासे भ्रष्ट । माउसिसी येणें लाविलासे पाट ॥३॥ पितियाचा वेष धरुनियां वेगीं । मातेचें सुख भोगावया लागीं ॥४॥ आणि मी सांगो नवल काई । येणें बहिणी भोगिली एकेचि ठाई ॥५॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी जाणे । अनुभवावांचुनि कोण्हीच नेणें ॥६॥