भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार

aisa dustar bhavasagar | nenon kaisa utarun par

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥१॥ कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ध्रु.॥ मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥२॥ वासनेच्या लहरा येती । उद्योगहेलकावे बसती ॥३॥ तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधे बैसे ॥४॥