भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा

aisa tanv mola | tumacha nasel gopala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥१॥ मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळीं ॥ध्रु.॥ नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥ तुका म्हणे झाला । उशीर तो विठ्ठला ॥३॥