भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा तो ब्राह्मण दरिद्रें पीडिला । सदा स्वरूपीं झाला अखंडीत

aisa to brahman daridren pidila | sada svarupin jhala akhandit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा तो ब्राह्मण दरिद्रें पीडिला । सदा स्वरूपीं झाला अखंडीत ॥१॥ न करीच खंती कांहीं तो अंतरीं । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥२॥ नाहीं धड घर केवळ जर्जर । चंद्र प्रभाकर उगवती ॥३॥ बाळें पांच सात बाहाती झोंबती । भुकें तळमळिती सर्वकाळ ॥४॥ उष्णें पोळे वारा येतसे भरारा । मेघाचिया धारा घरामाजी ॥५॥ नामा म्हणे त्यानें प्रपंच सांडिला । परमार्थ मांडिला अखंडीत ॥६॥