भजनी मालिका

भजने

उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

उष्में न तपेचि सुधाकर । सीतें न पीडे वैश्वानर ॥१॥ तेंवि हरिभक्तांतें हरी । नेदी बुडों भवसागरीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उंसाचे सेजारीं येरंडाचें झाड । नाहीं त्याचा पाड गोडी आली ॥१॥ कर्पुरासी जाला दीपाचा शेजार । काय गुणें सार राहिल त्याचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऊंचा उंचपणा नीचा नीचपणा । तें नाहीं कारण विठ्ठलभेटी ॥१॥ उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणतां मुक्ती जड जीवां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला सुदिन उगवला दान आपुले घाला ॥ १ ॥ आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

ऋषि म्हणती हरि पातलेसें विघ्न । आतां कैसे प्राण वांचतील ॥१॥ कोणाचिया शुद्धि नाहींचिया कोणा । म्हणती नारायना मृत्यु आला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥ तपाचिया अंती शिव जाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥ जालों उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऎका दत्तात्रेय आख्यान । पार्वतीस सांगे त्रिलोचन । सकळ पतिव्रतांमाजीं पूर्ण । अनसुया जाण पवित्रता ॥१॥ ऎकोनी शिवाची वाणी । गदगदां हासे भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । श्रेष्ठ कोणी असेना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऎका पुण्य पवित्र कथा । सावधान व्हावें श्रोतां । जयाचेनि अवधानें सर्वथा । कलिकल्मषें नासती ॥१॥ जें आचरला अंबऋषी । रुक्मांगद सूर्यवंशी । तेंचि व्रत एकादशी । निजधर्मासी सांगेन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ