भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां

run vair hatya | hen ton na sute nenditan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऋण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥१॥ हें कां नेणां पांडुरंगा । तुम्ही सांगतसां जगा ॥ध्रु.॥ माझा संबंध तो किती । चुकवा लोकाची फजिती ॥२॥ तुका म्हणे या चि साठीं । मज न घेतां नये तुटी ॥३॥