भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋषिअंगणीं कामिनी। लोळती येऊनी दोघीजणी

rushianganin kamini| lolati yeuni doghijani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऋषिअंगणीं कामिनी। लोळती येऊनी दोघीजणी ॥१॥ तुम्हां दिला कोणे त्रास त्याचा करीन मी ग्रास।।२।। आम्ही बोलिलों रायासी घेत नाहीं उचितासी।।३।। ऐसें बोलतां वचन राव कोपला दारुण ॥४॥ केलें प्रधानें ताडण बाहेर घातलें मारून ||५|| त्यांच्या परिसोनी बोला। विश्वामित्र कोपें आला ॥६॥ म्हणे रायासी अथमा माझी प्रताप महिमा।।७॥ वसिष्ठाच्या पडिभारें मातलासी द्रव्ये बोरे ॥८॥ निर्वर श्वापदांसी। कारे मारिलें तयासी ।।९।। वधूनियां शेवटीं त्यासी मारियेल्या तापस दासी।।१०।। पुढें रसाळ आहे कथा । निद्रा लागेल नृपनाथा ।।११।। स्वप्नीं मागेल दानासी म्हणे नामयाची दासी ।।१२।