भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋषि आश्रमा येउनी । येतां देखे ताराराणी

rushi ashrama yeuni | yetan dekhe tararani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऋषि आश्रमा येउनी । येतां देखे ताराराणी ।।१।। माव करूनि तात्काळ । कैसा निर्मिला नृपाळ ||२|| येऊनि आश्रमासी पाहे डोळां देखियेला राय ॥३॥ शुद्ध सुमन से नीरा घालिताती विंझणवारा॥२४॥ सुगंध चंदन चर्चिती नानापरींच्या उठ्या देती।।५।। रत्नखचिताची झारी राय घेऊनियां करी ॥६॥ करी आनंदें प्राशन । पुढें दिव्यान्न भोजन ॥७॥ ऐसें करितां अवलोकन । राजा पाहे श्यामवदन ||८|| नव्हे तेंचि कैसें झालें । सूर्या अंधत्व आलें ।।९।। पुष्पभार शेषावरी। कैसा आजि झाला भारी ||१०|| ध्रुव मेरु गजब जिला । तैसी परी झाली रायाला ।। ११ ।। जोडोनियां करपया। म्हणे बरी केली सीमा ||१२|| ऐसें होतें जरी मनीं । ती कां राज्य दिलें दानीं । ।१३।। बुद्धि भविष्यानुसार मी तो आहे येथें स्थिर ||१४|| म्हणोनियां पुढे जाय। अव्हेरिलें धर्मपोय ।। १५ ।। मार्गी देखियेलें राया। जनी म्हणे लागे पायां ।। १६ ।।