भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋषि म्हणती हरि पातलेसें विघ्न । आतां कैसे प्राण वांचतील

rushi mhanati hari patalesen vighna | atan kaise pran vanchatil

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऋषि म्हणती हरि पातलेसें विघ्न । आतां कैसे प्राण वांचतील ॥१॥ कोणाचिया शुद्धि नाहींचिया कोणा । म्हणती नारायना मृत्यु आला ॥२॥ कडाडली वीज निरंजनीं जेव्हां । मुक्ताई तेव्हां गुप्त जाली ॥३॥ वैकुंठीं लक्ष घंटा वाजती एकघाई । जाली मुक्ताई स्वरूपाकार ॥४॥ एक प्रहर जाला प्रकाश त्रिभुवनीं । जेव्हां निरंजनीं गुप्त जाली ॥५॥ गेलें निवारूनी आकाश अभूट । नामा म्हणे कोठें मुक्ताबाई ॥६॥