भजनी मालिका
← भजनांकडे परत

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ

samayasi sadar vhaven | dev thevile taisen rahaven ||dhru

रचनाकार: संत सावता · अभंग
समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥ कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार । कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥ कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य । कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥ कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन । कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥ कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा । कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥