भजनी मालिका
← भजनांकडे परत

विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं । दाटले ह्रदयीं करुणाभरितें

vikasila nayan sphuran alen bahin | datale hradayin karunabhariten

रचनाकार: संत सावता · अभंग
विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं । दाटले ह्रदयीं करुणाभरितें ॥ १ ॥ जातां मार्गी भक्त सावता तो माळी । आला तया जवळी पांडुरंग ॥ २ ॥ नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भीतरीं गेला देव ॥ ३ ॥ माथा ठेऊनि हात केला सावधान । दिलें आलिंगन चहूं भुजीं ॥ ४ ॥ चरणीं ठेऊनि माथा विनवितो सावता । बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥ ५ ॥