भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

आम्ही तों आपुलें निवेदिलें पायीं । अंतरीचे नाहीं वंचियेलें ॥१॥ तुम्ही सर्वजाणा जाणतां अंतर । काय परिहार वाउगाची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्ही तों जिवें वेंच केला । तुमच्या बोलावरी देवा तंव तें तुम्हासी ठावे ॥ १॥ किती वेळ दावावें बोलोनि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्हीं न मागों ऐसा कधीं । कृपानिधी वर दयाल ॥१॥ आपुल्या पायीं वसवा चित्त । माझें अखंडित दुजें न मार्गो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्ही नेणों भाव कैसा भक्तिरस । म्हणवूं तुमचे दास एक्या गुणें ॥१॥ मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । उभे महाव्दारीं ठाकोनिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्ही लेंकुरें लळेवाडें । तुमचीं तैसीं त्याहि पुढें । क्रीडा करुनी वाडे कोडें । येऊं भेटोनियां वोरसें ॥१॥ नाहीं तया पोटीं मैल । अत्यादरें धाडिलें असे मूळ । अक्रूर सांगताहे केवळ । भेटी आमुची इच्छितो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आरुपीं रुपाचा विस्तार । अगुणीं गुणांचा श्रृंगार । अनामीं नामांचा बडिवार । सहस्त्रावरी विराजला ॥१॥ नाहीं अवतारा मर्यादा । अपार गुणांची संपदा । केलीं चरित्रें सच्चिदानंदा । कोण वर्णितां पुरेल ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आलें शरण त्याचा करी प्रतिपाळ । न म्हणे हा दुर्बळ सदैव कांहीं ॥१॥ नेदी लागों वारा कल्‍पनेचा तया । न वजे पासोनियां दुरी कोठें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आले संन्यासी तापसी । योगी मुनिजन प्रांतवासी । पंडित पुराणिक ज्योतिषी । वेदाभ्यासी याज्ञिक ॥१॥ श्स्त्रपाणि रिक्तपाणी । पहाति कृष्णातें ते दुरुनी । अवलोकूनियां निज नयनीं । परम विस्मयातें पावती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा