भजनी मालिका
← भजनांकडे परत

आरुपीं रुपाचा विस्तार । अगुणीं गुणांचा श्रृंगार । अनामीं नामांचा बडिवार । सहस्त्रावरी विराजला

arupin rupacha vistar | agunin gunancha shrrungar | anamin namancha badivar | sahastravari virajala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आरुपीं रुपाचा विस्तार । अगुणीं गुणांचा श्रृंगार । अनामीं नामांचा बडिवार । सहस्त्रावरी विराजला ॥१॥ नाहीं अवतारा मर्यादा । अपार गुणांची संपदा । केलीं चरित्रें सच्चिदानंदा । कोण वर्णितां पुरेल ॥२॥ वृध्द तरुण नव्हती मुग्ध । सूक्ष्म स्थूळ ना अगाध । तरंग सागरींचे बुदबुद । नाहीं गणना त्यां जैशीं ॥३॥ अनंतरुपा मधुसूदना । जगत्रयव्यापका जनार्दना । योगिमानसमनोरंजना । अहो निधाना सुखमूर्ति ॥४॥ मुख मंडित सुंदर कर । कटी विराजले सुकुमार । चरणीं ब्रीदाचा तोडर । रुळती असुर तया तळीं ॥५॥ संत गर्जती स्वानंदें । कीर्त करिती ब्रम्हानंदे । नित्य करिती नाना छंदें । पढती ब्रिदें सुस्वरे ॥६॥ निळा म्हणे तया सुखा । नाहीं पार नव्हे लेखा । समाधि लागे सनकादिकां । तो सोहळा देखोनी ॥७॥