भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची

kaisa yacha vedh janati anubhavi | jayan ahe thavi krupa yachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची ॥१॥ न ये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारीं भुलवूनियां ॥२॥ नेदीचि बाहेरीं उमसों बुध्दि मना । भरुनियां भावना झांकोळिली ॥३॥ निळा म्हणे तोचि साक्ष माझया जिवीं । चाळक गोसावी ब्रम्हांडाचा ॥४॥