मागोनियां गोपी आल्या तिजपासीं । कोठें ह्लषि-केशी सांग आम्हां
magoniyan gopi alya tijapasin | kothen hlashi-keshi sang amhan
मागोनियां गोपी आल्या तिजपासीं । कोठें ह्लषि-केशी सांग आम्हां ॥१॥ टाकोनियां गेला मज पूतनारी । येथेंचि मुरारी गुप्त झाला ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
magoniyan gopi alya tijapasin | kothen hlashi-keshi sang amhan
मागोनियां गोपी आल्या तिजपासीं । कोठें ह्लषि-केशी सांग आम्हां ॥१॥ टाकोनियां गेला मज पूतनारी । येथेंचि मुरारी गुप्त झाला ॥२॥
manjarache dole gele | undir dharaya talamale
मांजराचे डोळे गेले । उंदिर धराया तळमळे ॥१॥ तैंसा नव्हेरे संन्यास । धांवे विषयावरी हव्यास ॥२॥
manjaren keli ekadashi | ilavari hoten upavasi | yatna karitan paranyasi | dhanuni givasi undiru
मांजरें केली एकादशी । इळवरी होतें उपवासी । यत्न करितां पारण्यासी । धांऊनि गिवसी उंदिरु ॥१॥ लांडगा वै-सला ध्यानस्थ । तोंवरी असे निवांत । जंव पेट सुटे जीवांत । मग घात करी वत्साचा ॥२॥
majha nama janv nanvarupa ala | janv mhanon lagala gharadar
माझा नामा जंव नांवरूपा आला । जंव म्हणों लागला घरदार ॥१॥ तंव कैसें विघ्न उठिलें गे माये । नामा पंढरिरायें भुलविला ॥२॥
majha nama maj dei | jiv dein tujhe payin
माझा नामा मज देई । जीव देईन तुझे पायीं ॥१॥ पुंडलिका भुलविलें । तैसें माझें बाळ केलें ॥२॥
majha nama maj dein | jiv dein tujhe payin
माझा नामा मज देईं । जीव देईन तुझे पायीं ॥१॥ पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया बाळा केलें ॥२॥
majha bap majha vithova rakhumai | vadil vandhu bhai pundalik
माझा बाप माझा विठोवा रखुमाई । वडील वंधु भाई पुंडलिक ॥१॥ साधुसंत जण सोईरे हे जाण । वंदीन वरण भावें त्यांचें ॥२॥
majha shinabhag gela | tuj pahatan viththala
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला ॥१॥ पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं ॥२॥
majhiya pitayachi hoil nidrabhang | na ghade prasang bolayacha
माझिया पितयाची होईल निद्राभंग । न घडे प्रसंग बोलायाचा ॥१॥ क्षण एक मौन धरूनियां रहा । शरणागत पहा कृपादृष्टी ॥२॥
majhiya bapacha tujapashin theva | vitho mhane dyava keshiraja
माझिया बापाचा तुजपाशीं ठेवा । विठो म्हणे द्यावा केशीराजा ॥१॥ ठेविलें ठेवणें झडकरी देईं । नेव्हार कांहीं लावूं नको ॥२॥
majhiya bapachi mirashi ga deva | tujhi charanaseva panduranga
माझिया बापाची मिराशी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥ उपास पारणें राखें दारवंटा । केला भाग्य वांटा आम्हांलागीं ॥२॥
majhiya bapasi tujhachi vishvas | mhanavi tujha das antarang
माझिया बापासी तुझाचि विश्वास । म्हणवी तुझा दास अंतरंग ॥१॥ वृत्तिसहित मन ठेवुनी तुझ्यापाय़ीं । तुजपरतें कांहीं जाणेचिना ॥२॥
majhiya manachen hindanen je je thayin | tethen tethen rahi panduranga
माझिया मनाचें हिंडणें जे जे ठायीं । तेथें तेथें राही पांडुरंगा ॥१॥ भीमा चंद्रभागा वैकुंठ पंढरी । दावीं दृष्टीभरी निरंतर ॥२॥
majhiya manen maj upadesh kela | to maj bimbala hladayakamalin
माझिया मनें मज उपदेश केला । तो मज बिंबला ह्लदयकमळीं ॥१॥ निर्वाणींची एक सांगितली खून । कैवल्य चरण केशवाचे ॥२॥
majhiye janani harini | guntalis kavane vanin
माझिये जननी हरिणी । गुंतलीस कवणे वनीं ॥१॥ मुकें तुझें मी पाडस । चुकलें माये पाहें त्यास ॥२॥
majhi andhalyachi kathi | adakali kavane betin
माझी आंधळ्याची काठी । अडकली कवणे बेटीं ॥१॥ आतां सांगूं मी कवणासी । धांवें पावें ह्रषिकेशी ॥२॥
majhi kon gati sang pandharinatha | tarisi anath kin budavisi
माझी कोण गति सांग पंढरिनाथा । तारिसी अनाथ कीं बुडविसी ॥१॥ मनापासोनियां सांग मजप्रती । पुसें काकुळती जीवाचिये ॥२॥
majhen kulinchen daivat | bap majha pandharinath
माझें कुळींचें दैवत । बाप माझा पंढरिनाथ ॥१॥ पुंढरीसि जाऊं चला । भेटूं रखुमाई विठठला ॥२॥
majhe gunadosh jari vicharisi | sarva narayan aparadhi
माझे गुणदोष जरि विचारिसी । सर्व नारायण अपराधी ॥१॥ सेवाहीन दीन पातकाची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥२॥
majhen ghar tuvan purvinch budavilen | jen darshanasi alen bal majhen
माझें घर तुवां पूर्वींच बुडविलें । जें दर्शनासी आलें बाळ माझें ॥१॥ नेणों काय वर्म तुझें सांपाडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥