भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा नामा जंव नांवरूपा आला । जंव म्हणों लागला घरदार

majha nama janv nanvarupa ala | janv mhanon lagala gharadar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझा नामा जंव नांवरूपा आला । जंव म्हणों लागला घरदार ॥१॥ तंव कैसें विघ्न उठिलें गे माये । नामा पंढरिरायें भुलविला ॥२॥ सांग बा विठ्ठला म्यां काय केलें । नामया कां भुलविलें कवण्या गुणें ॥३॥ आम्ही गा सिंपिये अनाथें पैं दीनें । करूं सिवने टिपणें पोट भरूं ॥४॥ त्यासी देवा तुवां आणियेला क्षयो । कैंचा आम्हां देवो निर्मिलासी ॥५॥ असतां चराचर न बुडतां हे सृष्टी । कां गा घेसी पाठी दुर्बळीची ॥६॥ एक बाळ माझें धरिली त्याची आस । त्यां कैसी निराश मांडियेली ॥७॥ दिसां मासां गर्भ जाणोनियां पोटीं । त्याची आस मोठी करिती लोक ॥८॥ एवढा माझा नामा कैसेन विसरेन । देई कृपादान दुर्बळासी ॥९॥ तूं अनाथा गोसावी दिनाचा कैवारी । तें ब्रीद श्रीहरी काय जालें ॥१०॥ बिघडलें पाडस करी एके ठायीं । विनवितें गोणाई केशिराजा ॥११॥