भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया बापाचा तुजपाशीं ठेवा । विठो म्हणे द्यावा केशीराजा

majhiya bapacha tujapashin theva | vitho mhane dyava keshiraja

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझिया बापाचा तुजपाशीं ठेवा । विठो म्हणे द्यावा केशीराजा ॥१॥ ठेविलें ठेवणें झडकरी देईं । नेव्हार कांहीं लावूं नको ॥२॥ आपुलें मागतों कोण आड येईल । आतां जाणवेल तुझें माझें ॥३॥ विटेसहित चरणीं घालीन मिठी । करीन संवसाटी जन्मोजन्मीं ॥४॥ विठा म्हणे मज खवळिसी वांयां । पिसाळलिया पायां झोंवेन तरी ॥५॥