भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया पितयाची होईल निद्राभंग । न घडे प्रसंग बोलायाचा

majhiya pitayachi hoil nidrabhang | na ghade prasang bolayacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझिया पितयाची होईल निद्राभंग । न घडे प्रसंग बोलायाचा ॥१॥ क्षण एक मौन धरूनियां रहा । शरणागत पहा कृपादृष्टी ॥२॥ करूनि निर्धार आलेली जेणें भावें । जतन करावें वचन देवा ॥३॥ नच जावें देवा माझे गांवेहूनी । मागतों प्रार्थुनी हेंचि तुम्हां ॥४॥ माझें सुख पहावें मागेन तें द्यावें । माझे गांवीं व्हावें अधिपती ॥५॥ नामयाचा स्वामी भक्तीसी भुलला । पुंडलीकें राहविला पंढरीये ॥६॥