भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें कुळींचें दैवत । बाप माझा पंढरिनाथ

majhen kulinchen daivat | bap majha pandharinath

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझें कुळींचें दैवत । बाप माझा पंढरिनाथ ॥१॥ पुंढरीसि जाऊं चला । भेटूं रखुमाई विठठला ॥२॥ पुंडलीकें बरवें केलें । कैसें भक्तीनें गोविलें ॥३॥ नामा म्हणे नीट । पायीं जड-लीसे ईट ॥४॥