भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें घर तुवां पूर्वींच बुडविलें । जें दर्शनासी आलें बाळ माझें

majhen ghar tuvan purvinch budavilen | jen darshanasi alen bal majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझें घर तुवां पूर्वींच बुडविलें । जें दर्शनासी आलें बाळ माझें ॥१॥ नेणों काय वर्म तुझें सांपाडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥ लौकिक परिहार देसील कासया । मी तुज ऐसिया बरबें जाणें ॥३॥ कटीं ठेउनि कर उभा गरुडपारीं । हें तंव अंतरीं हारपला ॥४॥ नाहीं चळणवळण न लावी पात्या पातें । लागलें निरूतें लक्ष तुझें ॥५॥ तुझी याची खूण अंतरींची एकी । दाविसी लौकिकीं भिन्नपण ॥६॥ सांडियेली येणें लौकिकाची लाज । नव्हे माझा मज कांहीं केल्या ॥७॥ तुझेंनि सुखें धाला आनारिसा जाला । अभिमान मावळला समूळ याचा ॥८॥ देहीं पैंज असोनी विदेही दिसत । प्रेमें वोसंडत ह्रदयकमळीं ॥९॥ तूं अनाथा कैवारी ऐसी वेदवाणी । परी कां नये अजोनी कणव तुज ॥१०॥ गोणाई म्हणे माझा नामा देईं हातीं । लागेन पुढता-पुढती तुझे पायीं ॥११॥