भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

तूं जाऊं नको जेथें तेथें । जरी तुज मुक्तीचें आर्तें । तुज मी सांगेम हित । देऊनि चित्त परियेसें ॥१॥ शंभु अडसष्टी तीर्थांचेम माहेर । सकळ सिद्धि ऋषीश्वर । मध्यान्हकाळीं सुरवर । पंढरपूर ठाकती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥ डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥ तूं माझी गाउली मी तुझें वासरूं । नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तूं माय माउली आस केली थोरी । वास निरंतरीं पंढरिये ॥१॥ स्वरूप दाखवी एक वेळां मज । धरूं नको लाज पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तूं माय माउली म्हणोनि आस केली । विठ्ठलें पाहिली वास तुझी ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तृणाचिया लोभेम गायी गेल्या दुरी । पाचारी मुरारी नामें त्यांचीं ॥१॥ चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने । येईं ताम्रपर्णे धांवोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेचि भक्तिभावें पतीपुढें ठेवी । पाहोनी गौरवी ब्रम्हनिष्ठा ॥१॥ तया योग्य नव्हेचि गे हा पदार्थ । आमुचिया आर्त तुळसीदळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेज स्पर्शें ज्योती कर्पुरीं निघाली । दोन्ही तीं निमालीं एकदांची ॥१॥ आघातानें नाद घंटेतून उठे । शेवटीं तो मिटे घंटेमाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेणें उपदेशें पारध्यासी ज्ञान । करी तो कीर्तन नाम-घोषें ॥१॥ संचिताचा नाश क्रियमाण बुडविलें । त्या सहज जोडलें मोक्ष सुख ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव ॥१॥ म्हाळसेलागीं पूजा केली असे निगुतीं । राहिले दहा रात्रीं ह्रषिकेशी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेरा माजी तीन सात साक्षाक्तार । आठव निर्धार असी पद ॥१॥ नवमापासूनि दशमाचे अंतीं । बारावा निश्चिती योग जाणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेव्हां प्रश्र करी पार्वती आदरें । शिवाप्रती कर जो-डोनियां ॥१॥ सांगावाजी स्वामि ऐसा इतिहास । गातां जोडे वास तुझे पायीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तेहतीस कोटींची केली सोडवण । तो हा राम जपून धरा वेगीं ॥१॥ राघवाचें नाम वाचेसी उच्चारा । निजाचा सोयरा रामचंद्र ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तो देव स्मरारे अनंत । जो कां वैकुंठींचा नाथ । दृढ धरा रे ह्लदयांत । तेणें यमपंथ चुकेल ॥१॥ आकांतीं द्रौपदीयें स्मरिला । तिचीं वस्त्रें आपणचि झाला । सभेमाजी मान रक्षिला । काळ पैं झाला कौरवांचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तोडीं हें बिरडें मोह ममता आधीं । विषय बाधा कधीं गुंफो नको ॥१॥ असे घराश्रमीं भजे सर्वांभूतीं । मी माझें पुढतीं म्हणों नको ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तोंवरी रे तोंवरी वैराग्याचें ठाण । जंव कामिनी कटाक्ष बाण लागले नाहीं ॥१॥ तोंवरी रे तोंवरी आत्मज्ञान बोध । जोंवरी अंतरीं कामक्रोध उठले नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव