भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुह्मी आह्मी जाऊं चला । भेटूम जीवलगा विठ्ठला

tuhmi ahmi jaun chala | bhetum jivalaga viththala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुह्मी आह्मी जाऊं चला । भेटूम जीवलगा विठ्ठला ॥१॥ विठो सांपडला फुका । जो दुर्लभ तिहीं लोकां ॥२॥ वेदपुराणासी वाड । तो हा भाविकांसी भ्याड ॥३॥ नामा ह्मणे वंदूं चरण । कांही पुसूं जिवींची खूण ॥४॥