भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेणें उपदेशें पारध्यासी ज्ञान । करी तो कीर्तन नाम-घोषें

tenen upadeshen paradhyasi dnyan | kari to kirtan nam-ghoshen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तेणें उपदेशें पारध्यासी ज्ञान । करी तो कीर्तन नाम-घोषें ॥१॥ संचिताचा नाश क्रियमाण बुडविलें । त्या सहज जोडलें मोक्ष सुख ॥२॥ दुसर्‍या शिवरात्री पूजिलें शंकरा । करोनियां बरा भाव शुद्ध ॥३॥ विमानीं वाहोनी स्वस्थानीं स्थापिला । येथूनि संपला कथाभाग ॥४॥ नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप । जाणो-नियां जप करा त्यांचा ॥५॥