भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं सद्‌गुरु आनंद भरित । तुझा आदि ना अंत

tun sad‌guru anand bharit | tujha adi na ant

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तूं सद्‌गुरु आनंद भरित । तुझा आदि ना अंत । तूं प्रकाशा प्रकाशमंत । तुज नमो स्वामिया ॥१॥ बुद्धिपालका वैभवा । तूं देवाधिदेवा । तूं जाणसी अंतरींचा गोवा । उगवीं उगवीं स्वामिया ॥२॥ तूं सत्त्वरूपाची चौघडी । आणि परेची पैलथडी । बोधभावें करी उघडी । पार उतरी स्वामिया ॥३॥ तूं विश्रांतीचें स्थळ । तूं निर्गुणानिगुण निर्मळ । निवृत्तिमतीचा विशाळ । पुरवी आळ सोपानाची ॥४॥