जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें
janmajanmantarin jhala tuj shram | hmanoniyan brahma alen yethen
जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें ॥१॥ राखतील गाई मारीतील दुष्ट । न करी बोभाट जनामध्यें ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
janmajanmantarin jhala tuj shram | hmanoniyan brahma alen yethen
जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें ॥१॥ राखतील गाई मारीतील दुष्ट । न करी बोभाट जनामध्यें ॥२॥
janmamaranachen bhay maj davisi | ten myan hrashikeshi angikaralen
जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥ आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥
janmalyapasuni soshile pravas | viyog pahavaya jale atan
जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥
janma yeuniyan kay punya kelen | balapan gelen vanyanvin
जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥ संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥
janma yeuniyan dekh | kara dehachen sarthak
जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक ॥१॥ वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक देहाचें ॥२॥
jap tap anushthan hari | ekachi to namaskari
जप तप अनुष्ठान हरी । एकचि तो नमस्कारी । भूतद्वेष कदा न करी । तप सामुग्री हेचि तुझी ॥१॥
jambuya dvipamaji ek pandharapuraganch | dharmachen nagar dkha vitho patil tvachen nanv | chala jaun taya thaya kanhin bhojan magaya
जंबुया द्वीपामाजी एक पंढरपुरगांच । धर्माचें नगर द्खा विठो पाटील त्वाचें नांव । चला जाऊं तया ठाया कांहीं भोजन मागाया ॥१॥ विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणीं लक्ष लागो । ज्याशी नाहीं पंख पाय तेणें करावें तें काय ।
jay viththal shriviththal | jay jay viththal viththal
जय विठ्ठल श्रीविठ्ठल । जय जय विठ्ठल विठ्ठल ॥१॥ परब्रह्म विठ्ठल मूर्ति विठ्ठल । निरंजन विठ्ठल ॥२॥
jayajayakaren tali pitali sakalan | ghatiyeli shila samadhisi
जयजयकारें टाळी पिटली सकळां । घातियेली शिळा समाधिसी ॥१॥ निवृत्तिमुक्ताईनें घातियेली घोन । करितो समाधान पांडुरंग ॥२॥
jayajayakaren tali pitili sakalin | chalali mandali vaishnavanchi
जयजयकारें टाळी पिटिली सकळीं । चालली मंडली वैष्णवांची ॥१॥ पंढरीचा पोहा निघाला बाहेरी । कीर्तन गजरीं पुढें होत ॥२॥
jayache udarin janmala nar | pidi taya thor sarvakal
जयाचे उदरीं जन्मला नर । पिडी तया थोर सर्वकाळ ॥१॥ मानिली अंतरीं सखी जीवनलग । आत्महत्या मग घात करी ॥२॥
jayachen darushan hotanchi duruni | sarva jaye paloni pap tap
जयाचें दरुषण होतांची दुरुनी । सर्व जाये पळोनी पाप ताप ॥१॥ तीर्थासी पावन कलिमलछेदन । देवाचें कल्याण जयाचेंनी ॥२॥
jayalagin hladay ule | ten myan jivensi dharilen
जयालगिं ह्लदय उले । तें म्यां जीवेंसि धरिलें ॥१॥ विठ्ठालाचीं पाऊलें । म्यां मस्तकीं वाहिलीं ॥२॥
jayasi lagali ramanamachi godi | tyanen keli praudhi paramarthachi
जयासी लागली रामनामाची गोडी । त्यानें केली प्रौढी परमार्थाची ॥१॥ कलिमाजीं नाम सुलभ सोपारें । यालागीं आदर नामीं धरा ॥२॥
jari mhanasi dev dekhila | tari ha bol bhala navhe namya
जरी म्हणसी देव देखिला । तरी हा बोल भला नव्हे नाम्या ॥१॥ जोंवरी मी माझें न तुटे । तंव आत्माराम कैसेंनि भेटे ॥२॥
jalin budabude dekhatan dekhatan | kshan na lagatan di-senati
जळीं बुडबुडे देखतां देखतां । क्षण न लागतां दि-सेनाती ॥१॥ तैसा हा संसार पाहतां पाहतां । अंत:काळीं हासां काय नाहीं ॥२॥
janv hans kaya nav jay sandoni | tanv ghein thakoni ramanam
जंव हंस काया नव जाय सांडोनी । तंव घेईं ठाकोनि रामनाम ॥१॥ अंत काळवेळीं तुझें नव्हे कोण्ही । मी माझें ह्मणवूनि भु-ललासी ॥२॥
jahaj tarilen tarilen | shevatin ugamasi alen
जहज तारिलें तारिलें । शेवटीं उगमासी आलें ॥१॥ भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥२॥
jaun panya nisuravanya | alaviti god ranya ||dhru
जाऊं पाण्या निसुरवाण्या । आळवीती गोड राण्या ॥ध्रु०॥ गोविंद गीतीं गाऊं गोविंद गीतीं गाऊं । आनंदें जाऊं पाण्या ॥१॥
jaun mhanatan pandhari | yam thor chinta kari
जाऊं म्हणतां पंढरी । यम थोर चिंता करी ॥१॥ धरितां पंढरीची वाट । पापें पळालीं सपाट ॥२॥