भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक

janma yeuniyan dekh | kara dehachen sarthak

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक ॥१॥ वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक देहाचें ॥२॥ ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा ॥३॥ नाम तारक त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥