भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीकृष्ण लीलामृत बाणतांचि गोडी । कथेचि परवडी आवडती

shrikrushna lilamrut banatanchi godi | kathechi paravadi avadati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीकृष्ण लीलामृत बाणतांचि गोडी । कथेचि परवडी आवडती ॥१॥ तयाचा विस्तार तोचि बोलवीता । आहे सर्व सत्ता त्याचे हातीं ॥२॥ तेथें मी पामर काय बोलूम वाणी । दिसे किविल-वाणी संतांपुढें ॥३॥ म्हणोनी विस्तार आटोपिला नाहीं । वेदांसी तें नाहीं पुरतें ठावें ॥४॥ नामा म्हणे नामें आठवा अवतार । पूर्ण ब्रह्म साचार कृष्णरूप ॥५॥