भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीहरि श्रीहरि ऐसें वाचे म्हणेन । वाचा धरिसी तरी श्रवणें ऐकेन

shrihari shrihari aisen vache mhanen | vacha dharisi tari shravanen aiken

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीहरि श्रीहरि ऐसें वाचे म्हणेन । वाचा धरिसी तरी श्रवणें ऐकेन ॥१॥ श्रावणीं दाटसी तरी मी नयनीं पाहिन । ध्यानीं मी ध्याईन जेथें तेथें ॥२॥ जेथें जाये तेथें लागलासी आम्हां । न संडी म्हणे नामा वर्म तुझें ॥३॥