भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेवटची समाधि जाली जैसी तैसी । तुज ह्रषिकेशी समर्पिली

shevatachi samadhi jali jaisi taisi | tuj hrashikeshi samarpili

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शेवटची समाधि जाली जैसी तैसी । तुज ह्रषिकेशी समर्पिली ॥१॥ आपुल्या सत्ताबळें चालविलें हरि । विष्णुदासावरी कृपा केली ॥२॥ नेणों कैसा होईल समाधीचा प्रसंग । बोलिलेति अंगें पांडुरंगा ॥३॥ मुकियाला वाचा दिधली श्रीरंगें । इच्छिला प्रसंग सिद्धी नेला ॥४॥ नामा म्हणे देव माय बाप विठ्ठल । म्हणोनि माझे बोल स्वीकारिले ॥९॥