भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीराम सोयरा आला माझ्या घरा । दिधला म्यां थारा ह्लदयीं माझा

shriram soyara ala majhya ghara | didhala myan thara hladayin majha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीराम सोयरा आला माझ्या घरा । दिधला म्यां थारा ह्लदयीं माझा ॥१॥ पावलों विश्रांति धालें माझें मन । न लगे आतां ध्यान शिकावया ॥२॥ ज्या साठीं हिंडणें जटामौन नग्न । ध.रिलें तेणें ठाणें ह्लदयीं माझ्या ॥३॥ योग याग तप करावें साधन । तोहि जाण ओंठीं सदा वसे ॥४॥ तीर्थयात्रा देव ज्यासाठीं करावे । तें ब्रह्म बरवें नांदे देहीं ॥५॥ ब्रह्मचर्यादिक आश्रम साधावे । केली तया देवें देहीं वस्ती ॥६॥ वेदशास्त्र पुराण ज्यासाठीं पठण । तो नांदे परिपूर्ण ह्लदयीं माझ्या ॥७॥ ऐसा तो सज्जन जिवलग सांगाती । दिधली मज विश्रांति नामसंगें ॥८॥ तैसें नव्हे ज्ञान फुटक्या हां-डोरयाचें । धरूनियां साचे खोखा वाजे ॥९॥ स्वधर्मीं विचार वेंचाचे अन्वयें । लाधले हे पाय गुरुकृपें ॥१०॥ अभंग भंगेना फोडितां फुटेना । गुरुकृपें जाणा प्राप्त जालें ॥११॥ चावळी वटवूट बोलणें बासर । हे तंव अवघे चार मर्कटाचे ॥१२॥ परनिंदा परद्रौहो करणें या संतांचा । जाळावी ते वाचा ज्ञान त्याचें ॥१३॥ न लगे सोंग ध-रणें देह ताप करणें । ऐसें निजध्यान हातां आलें ॥१४॥ नाम घेतां रूप ह्लदयीं बिंबलें । सर्वत्र देखिलें तेंचि डोळां ॥१५॥ नाम-मंत्र बीज नाहीं जंववरि । केशव तंववरि प्राप्त नाहीं ॥१६॥ नामाचे धारक ते केशवरूप । वैकुंठींचें सुख रुळे पायीं ॥१७॥ नामें-विण ज्ञान नपूंसक ऐसें । नातळती कैसे साधुसंत ॥१८॥ नाम तेंचि रूप रूप तेंचि नाम । नाम रूपाभिन्न नाहीं नाहीं ॥१९॥ आकारला देव नामरूपा आलें । म्हणोनि स्थापिलें नामदेवें ॥२०॥ नामापरता मंत्र नाहीं वो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥२१॥ नामा ह्मणे ज्ञान केशव केवळ । जाणती प्रेमळ भले भले ॥२२॥