भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

जनी म्हणे पांडुरंगा माझ्या जीवींच्या जीवलगा। विनवितें सांगा। महिमा साधुसंतांचा ॥१॥ कैसी वसविली पंढरी। काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

जनीचिया बोलें करी नित्य काम। वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥ जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं तयाचे चरणीं ओढवी माथा।।२।।

रचनाकार: संत जनाबाई