भजनी मालिका
← भजनांकडे परत

होउनि विठोबाचा दास । करी आस दुजियाची

houni vithobacha das | kari as dujiyachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होउनि विठोबाचा दास । करी आस दुजियाची ॥१॥ वायां माता व्याली तया । भूमार कासया अवनीसी ॥२॥ पूर्वज तया कंटाळती जन्मला । म्हणती खर हा ॥३॥ एकाजनार्दनीं म्हणे । तया पेणें यमलोकीं ॥४॥